प्रतिष्ठा न्यूज
मुंबई, दि. ६ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने सांगली जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रितांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कार्ये) अधिनियम, १९९८ तसेच २००० मधील सुधारित तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार लोकसभा व विधानसभेतील सदस्यांमधून २ नामनिर्देशित सदस्य, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले २ नामनिर्देशित सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ११ विशेष निमंत्रित अशा एकूण १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा व विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य :
खासदार धैर्यशील संभाजीराव माने
आमदार गोपीचंद पडळकर
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख
दीपक आबासाहेब शिंदे (म्हैसाळकर)
विशेष निमंत्रित :
भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट नानासाहेब महाडिक
माजी नगरसेवक भारती हेमंत दिगडे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. पद्माकर धनवंत जगदाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत प्रकाश भोसले-पाटील
आटपाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र (बापू) खरात
जनसुराज्य शक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष समित चंद्रशेखर ऊर्फ बाळासाहेब कदम
वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल गुणवंत पाटील
शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख उदय ऊर्फ आनंदराव रामचंद्र पवार
आटपाडी येथील नेते तानाजी भगवान पाटील
विट्याचे ॲड. वैभव सदाशिवराव पाटील
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक जयश्री मदन पाटील
यांचा यामध्ये समावेश आहे.
शासनाने जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, सांगली यांना या आदेशाची पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या सदस्यांचे नामनिर्देशन पुढील आदेशापर्यंत किंवा शासनाच्या नव्या निर्णयापर्यंत लागू राहणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या