प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 3 : सांगली जिल्ह्यात मान्सूनमूळे होणारे संभाव्य नुकसान टाळणे व मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ) एक पथक सांगली जिल्ह्यात दि. 01 जुले 2026 रोजी दाखल झाले आहे. हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.या पथकामध्ये पथक प्रमुख इन्स्पेक्टर संजय मौर्य, सब इन्स्पेक्टर रितेशकुमार व इतर २४ जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, बुडालेल्या व्यक्तींसाठी डीप डायव्हिंग सेट, स्पेशल इक्विपमेंट अॅंड बॅटरी ऑपरेटर इक्विपमेंट, रोप, रेस्क्यू साहित्य, बोरवेल रेस्क्यू, न्यू एअरलिफ्टिंग बॅग, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे.
मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी. आर. एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या