प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:पलूस तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आमणापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे राहुल दत्तात्रय तातुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्याचे नेते महेंद्र आप्पा लाड यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या राहुल तातुगडे यांच्या निवडीमुळे गावासह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.सध्या आमणापूर ग्रामपंचायतीवर भाजपचे आकाराम पाटील, पोपट फडतरे आणि काँग्रेसचे राहुल तातुगडे यांच्या ग्रामविकास पॅनेलची सत्ता आहे. ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी भाजपच्या बालिका पाटील कार्यरत आहेत.उपसरपंच निवड प्रक्रियेसाठी ग्रामविकास अधिकारी संध्याराणी माने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. कोणताही विरोधी अर्ज न आल्याने राहुल तातुगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना राहुल तातुगडे यांनी, "माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील आणि तालुक्याचे नेते महेंद्र आप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमणापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू," अशी ग्वाही दिली.यावेळी नूतन उपसरपंच राहुल तातुगडे यांचा सरपंच व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मावळते उपसरपंच ज्ञानेश पाटील यांचाही गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच बालिका पाटील, माजी सरपंच आकाराम भाऊ पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश भैय्या पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाजीराव नाना पाटील, आमणापूर विकास सोसायटीचे चेअरमन वसंतराव पवार, कामगार नेते प्रकाश तातुगडे, मध्य रेल्वेचे माजी सदस्य श्रीकृष्ण औटे, माजी उपसरपंच मोनिका अनुगडे, संदीप काटवटे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी देशमुख, राजेंद्र पाटील, शारदा राडे, अंजना पाटील, प्रियंका कोकळे, माजी उपसरपंच सुखदेव मतकरी, मधुकर कांबळे, शरद औटे, निवृत्त पोलीस अधिकारी शिवाजीराव तातुगडे, रामचंद्र तातुगडे, संभाजी तातुगडे, युवा नेते संकेत पाटील, शितल मोरे, देवदास कोकळे, सचिन पाटील, विनायक कुलकर्णी, धनाजी जवादे, सोपान गोरड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या