प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे 'शिक्षणातील नाट्य व कला' या विषयांतर्गत ‘मंडला आर्ट आणि वारली पेंटिंग’ कार्यशाळा संपन्न झाली. भावी शिक्षकांच्या कलागुणांचा परिपोष व्हावा या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी (२०१४-१५ बॅच) सौ.नम्रता बोरगावकर-आचार्य यांनी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मार्गदर्शन केले.त्यांनी प्रशिक्षणार्थिनींना वारली चित्रकलेचा उगम,तिची सांस्कृतिक परंपरा तसेच मंडला आर्टमधील ध्यानात्मक एकाग्रतेचे महत्त्व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रभावीरीत्या विशद केले.पारंपरिक लोककलेचा शैक्षणिक संदर्भात अभिनव अवलंब केल्यामुळे अध्यापन अधिक परिणामकारक, आकर्षक व विद्यार्थीकेंद्रित होण्यास प्रेरणा मिळाली.सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांचे प्रेरणा मिळाली. डॉ. एल. व्ही. भंडारे, डॉ. ए. एस. चिखलीकर, डॉ. डी. टी. खजूरकर, प्रा. ए. आर. पंडित, प्रा. प्रमोद शेंडगे तसेच प्रशासकीय सेवक संजय कुंभार,हणमंत वाघमारे आणि सौ.अस्मिता साळी हे उपस्थित होते.या कार्यशाळेचे आयोजन डॉ. ए. एस. चिखलीकर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार कु.रुचिता घोडके यांनी केले.कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या