सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयटी पार्क विकसित झाले पाहिजे म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी होत आहे.
स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी उद्योग मंत्री असताना विलिंग्डन कॉलेज येथे आयटी पार्क साठी मोठी अशी सुसज्ज इमारत उभी केली मात्र सदर इमारत सुद्धा तकलादु आयटी पार्क दाखवून सदर इमारतीचा खाजगी व्यवसायासाठी वापरत झाला आहे. असा आरोप सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केला आहे.
साखळकर म्हणाले, आता त्याच धर्तीवर त्या ठिकाणची जवळपास साडेचार पाच एकर जागा
मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील आय टी पार्क विकसित करण्यासाठी मिलाप ही योजना अमलात आणली आहे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आयटी पार्क विकसित करण्यासाठी सदर जागा आयटी कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
मात्र एमआयडीसी मधील झारीतील शुक्राचार्य प्रशासन याचा गैरफायदा घेऊन बिल्डरांच्या घशात सदर जागा घालण्याचा उद्योग करत आहेत
नुकत्याच सांगली शहरातील या जागेचा ई ऑक्शन काढण्यात आला होता असे कळते त्याचे काय झाले माहित नाही.
मात्र आम्ही सांगलीकर आयटी पार्कच्या जागा अशा खाजगी बिल्डरांच्या घशात अत्यंत कमी किमतीत जाऊन देणार नाही किंवा ज्या काही इमारती आयटी पार्कच्या नावाखाली खाजगी व्यावसायिक चालवत आहेत त्याचा सुद्धा भांडाफोड करून त्यांना उघडे केल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्यपाल पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर आयटी पार्कच्या जागा वाचवण्यासाठी निवेदन पाठवले आहेत.
तात्काळ याचा बाजार नाही रोखला गेला तर आम्हाला सांगलीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल.
कारण आपल्या सांगली जिल्ह्यातील तरुणांना कामासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते आहे ह्याची जाणीव का कुणाला होत नाही.
याची सर्वस्वी जबाबदारी एमआयडीसी प्रशासन जिल्हा प्रशासन व राज्य सरकारवर राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या