सांगली प्रतिनिधी : आरबीएल बँक (पूर्वीची रत्नाकर बँक लिमिटेड) या अग्रमानांकित व्यावसायिक बँकेच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना "आरबीएल बँक कम्युनिटी स्टार" पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सांगली येथे संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यात सांगलीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, धार्मिक व व्यावसायिक क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत राहून समाजात आदर्श निर्माण करणारे डॉ श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आरबीएल बँकेच्या वतीने "आरबीएल बँक कम्युनिटी स्टार" पुरस्काराने गौरविण्यात आले.
या प्रसंगी बँकेचे अधिकारी श्री. प्रशांत पाटील यांनी श्री. रावसाहेब पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा सविस्तर परिचय उपस्थितांना करून दिला. तसेच बँकेचे क्लस्टर हेड विनायक आगवेकर यांनी "आरबीएल कम्युनिटी स्टार" पुरस्काराची माहिती देताना, विविध क्षेत्रातील मान्यवरांना बँकेच्या वतीने यापूर्वी हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे सांगितले. त्यामध्ये सांगलीची आंतरराष्ट्रीय कीर्तीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना तसेच उद्योजक श्री. संजय घोडावत यांचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले.या वेळी त्यांनी श्री. रावसाहेब पाटील यांचे अभिनंदन करून, भविष्यातही बँकेस व कर्मचाऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कारास उत्तर देताना श्री. रावसाहेब पाटील यांनी बँकेचे व्यवस्थापन व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. "कोणत्याही पदावर कार्यरत असताना त्या संस्थेचा विकास साधणे आणि सर्वसामान्यांचे हित जपणे या तत्त्वावर मी नेहमी काम केले," असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी बँकेचे सिनिअर मॅनेजर अरविंद चौगुले यांनी बँकेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली आणि आणि बँक परिसरातील लोकांच्या विकासासाठी आणि सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या सत्कार सोहळ्यासाठी बँकेचे अधिकारी श्री सुनील पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले
या कार्यक्रमास, आरबीएल बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्वदेशी उद्योगसमूहाचे सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या