मिरज : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष महिला सत्कार समारंभ, मार्गदर्शनपर व्याख्यान व मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांमध्ये सुरक्षा, सन्मान व अधिकार याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने मिरज तालुका संरक्षण अधिकारी बालाजी बोकलवाड यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान देत महिलांसाठी असलेल्या विविध संरक्षण कायद्यांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शाहीन शेख यांच्या “स्वतंत्र भारतीय माहिती अधिकार” या साप्ताहिकाच्या महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकामध्ये महिलांसाठी असलेल्या विविध संरक्षण कायद्यांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
तसेच महिलांना दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा यासाठी संगीनी ग्रुपच्या प्रियांका कार्लेकर यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शेख मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने,भाजपा महिला मोर्चाच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांमध्ये महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, माजी जि. प. अध्यक्ष प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषद सदस्य दिपाली कांबळे, नगरसेविका विद्या नलवडे, उज्वला कांबळे, अपर्णा शेटे, मालुश्री खोत, तसेच पदाधिकारी गीतांजली ढोपे पाटील, गंगुताई नाईक, रूपाली अडसुळे, अनघा कुलकर्णी, गायत्री सातपुते, साधना माळी, सारिका राहूटे, सुस्मिता कुलकर्णी, कपिला पाटील, ज्योती मगदूम, रूपाली मगदूम, ललिता मासाळ, ललिता कांबळे, संगीता जाधव, हिना जमादार आदि मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या