सांगली: राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त स्वा. से. कै. भाऊसो कृष्णा पाटील माध्यमिक विद्यालय, इनाम धामणी येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील लहान गटामध्ये कु. आराध्य शरद पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल आराध्यचा प्रशस्तिपत्रक व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक मा. श्री. विवेक पवार साहेब तसेच स्पर्धेचे परीक्षक मा. श्री. विजय कोळेकर सर (प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, विश्रामबाग, सांगली) यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. त्याच्या यशामागे आई व
यावेळी व्यासपीठावर बी. के. पाटील शाळेचे निकम सर, खोत मॅडम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आराध्यचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या