प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि. २५ : गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे नियत वयोमानानुसार एकाच संस्थेत 3४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे कौटुंबिक आयुष्य सुखासमाधानाचे, शांतीचे व भरभराटीचे जावो अशी शुभेच्छा देण्यात आली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नुतन प्रायार्य डॉ. प्रताप भोसले यांनी केले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, डॉ. मेथे यांनी कॉलेजच्या स्थापनेपासून १६ वर्षे प्राध्यापक आणि गेली १८ वर्षे प्राचार्य म्हणून कॉलेजच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्था पदाधिकारी व विश्वस्त आणि सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबरोबर त्यांचे कायमच स्नेहार्द संबंध राहिले. माझ्या संस्थेतील सर्व स्टाफ संस्थेवर प्रेम करतो आणि कर्तव्यदक्ष आहे. डॉ. राजेंद्र मेथे हे प्राचार्य तर होतेच त्याचबरोबर ते माझे घनिष्ठ मित्र म्हणून कायम लक्षात राहणार...
डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी वडिलांच्या संबंधित कॉलेजच्या गत स्मृतींना उजाळा दिला.
प्रा. डॉ. राजेंद्र मेथे म्हणाले, पृथ्वीराजबाबा पाटील यांनी प्रचंड खस्ता खात शून्यातून विश्व निर्माण केले आणि आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी घडत आहेत. गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमधून हजारो डॉक्टर्स आम्ही घडवले याचे खरे श्रेय पृथ्वीराजबाबांना द्यायला हवे. बाबांनी जसे विद्यार्थी घडवले तसे संस्थेतील कर्मचाऱ्यांची घरं उभी केली. आम्हाला स्वाभिमानी व स्वावलंबी बनवले. ते आदर्श शिक्षण संस्थाचालक व समाजकारणी नेता आहेत. विश्वस्त विरेंद्रसिंह आणि बाबांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मी कधीच विसरणार नाही.
यावेळी डॉ. मेथे यांच्या पत्नी सौ. पद्मजा, पुत्र डॉ. पृथ्वीराज व स्नुषा प्रियांका, समन्वयक प्राचार्य डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, डॉ. आकांक्षा जोशी, विनय डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुहास पाटील, डॉ. तजीन बिडीवाले, सोनाली भोरे, विलास शेवाळे, सर्व एचओडी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या