प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : क्रांतिज्योती घरगुती कामगार संघटना, महाराष्ट्र आणि सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने “मानसिक ताणतणाव आणि त्याचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता सेवासदन हॉस्पिटल, मिरज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मानसतज्ज्ञ डॉ. संज्योत देशपांडे (पुणे) उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विशाल सविता तेजराव नरवाडे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. रविकांत पाटील (चेअरमन – दत्तोपंत अंकोजी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण बोर्ड, पुणे), सदाशिव मंगदूम (माजी सैनिक – पूर्ण वेळ सेवक राष्ट्र सेवा दल ), कॉ. परशुराम कुंडले, सामाजिक कार्यकर्ते सोनू गवळी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कलावती पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.
घरगुती कामगारांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि ताणतणाव व्यवस्थापनाच्या उपाययोजना समजावून सांगणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. आयोजकांनी सर्व संबंधितांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या