सांगशी येथील कु. शिल्पा दत्तात्रय वारिक यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड
By -
मार्च १३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील सांगशी येथील कु. शिल्पा दत्तात्रय वारिक यांची महाराष्ट्र सुरक्षा बल, मुंबई (MSF) मध्ये निवड झाल्याबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कु. शिल्पा वारिक या सांगशी येथील साधे शेतकरी दत्तात्रय वारिक यांच्या कन्या असून, अत्यंत कष्टाच्या परिस्थितीतही त्यांनी शिक्षण पूर्ण करून हे यश मिळवले आहे. वडील दत्तात्रय वारिक यांनी साध्या शेतकरी कुटुंबातून मोठ्या मेहनतीने आपल्या मुलींना चांगले शिक्षण दिले असून, त्यांच्या परिश्रमाचे हे फळ असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कु. शिल्पा यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन करून सांगशी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मराठा महासंघ, तसेच संसाई तरुण मंडळ, सांगशी तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, गावातील तरुणांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या