प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरातील गुरुवार पेठ परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीचा वायरचा लोखंडी खांब रात्रीच्या अंधारात अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अज्ञात व्यक्तींनी हा खांब कापून नेल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.“सरकारी मालमत्ताच सुरक्षित नाही का?”असा सवाल आता स्थानिक लोकांच्यात उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे,कोणतीही सरकारी वस्तू हलवताना किंवा काढताना संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे.त्यामुळे हा खांब अधिकृतरीत्या काढण्यात आला की चोरी झाली,याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.स्थानिकांच्या मते, जर हा खांब अधिकृतरीत्या काढण्यात आला असेल,तर तो रात्रीच का काढला.? तसेच भारत संचार निगम लिमिटेड च्या अधिकाऱ्यांनी याबाबत परवानगी दिली होती का? तसेच संबंधितांनी योग्य ती प्रक्रिया पूर्ण केली होती का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असा प्रकार घडत असताना कोणतीही हालचाल न होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.आता या प्रकरणात भारत संचार निगम लिमिटेड कडून नेमकी चौकशी होणार का? दोषींवर कठोर कारवाई होणार का? की हा प्रकारही दडपला जाणार? याकडे संपूर्ण तासगावचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या