प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन संघटना यांच्या वतीने रविवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 6:00 वाजता मारुती चौकात प्रति वर्षाप्रमाणे गुढीपाडवा मेळावा होणार आहे. सदर मेळाव्यास प्रखर हिंदुत्ववादी *मा.सुनीलजी देवधर*बांगलादेश व पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार हिंदूंनो जागे व्हा* या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यंदाचा हिंदू एकता आंदोलनाचा संघटनेचा तिसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी नुकतीच हिंदू एकता आंदोलनाच्या सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली सर्किट हाऊस येथे संपन्न झाली.
*या बैठकीत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीची व युवा आघाडीची स्थापना या मेळाव्यात करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे, धुळे येथून हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र हिरवा करू, बांगलादेशी घुसखोर, संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार, मालेगावच्या महापालिकेमध्ये लावलेला टिपू सुलतान चा फोटो, गड जिहाद, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, इराणचा राष्ट्रअध्यक्ष खामेनेई याच्या मृत्यूनंतर मुस्लिमानी भारतामध्ये घातलेला धुमाकूळ या विषयावर मेळाव्यात समाचार घेतला जाणार आहे.
सदर मीटिंगमध्ये दत्ता भोकरे, संजय जाधव, बाळासाहेब मोहिते यांची मनोगते झाली व मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
सदर मीटिंगमध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, पै. प्रदीप निकम, प्रकाश चव्हाण, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव,अरविंद येतनाळे, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश निकम, सचिन देसाई, भूषण गुरव, अनिकेत अंबरुळे, सुमित शिंगे, गजानन माने, विकास आवळे, यश पाटील, प्रेम देसाई, कृष्णा नायडू, नारायण हांडे, संदेश खोत, प्रथमेश खिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या