प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुजरात मध्ये विजय रूपाणी यांना विमान टेकअप घेताना मारलं तर महाराष्ट्रात अजित दादांना विमान लँडिंग होताना मारलं असा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केला.
गुजरात मधील भाजपचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे गुजरात मधील पूर्वी झालेला हजारो कोटीचा घोटाळा बाहेर काढणार होते हे गुजरात मधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना व सध्या केंद्रामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते यांना कल्पना आली होती म्हणून त्यांना मारण्यासाठी आमदाबाद वरून माजी मुख्यमंत्री विजय रूपानी लंडनला जात असताना विमान टेक अप घेताना इंजनला सप्लाय होणारा इंधनपुरवठा बंद पाडून दुर्घटना घडवून त्यांना ठार करण्याचे प्लॅनिंग करण्यात आले होते, कारण अहमदाबाद एअरपोर्ट हे आपल्याच व्यक्तीकडे म्हणजेच अदानी ग्रुप कडे असल्यामुळे त्या एअरपोर्टवर आपण संगाल तसेच, जसे आपल्याला पाहिजे तसे कांड करून घटना घडवू शकतो , त्यामुळेच आमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये विमानाच्या इंजिनला सपलाय होणारा इंधनपुरवठा बंद करून ते विमान टेकअप घेतानाच पाडायचे नियोजन केले होते व ते त्यामध्येयशस्वी करण्यात त्यांना यश आले आणि त्या घटने मध्ये 260 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्याच पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रा सरकारमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आपल्याला डोईजड होत आहेत व आपलाच भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत हे त्यांना खटकलं होतं म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी राज्यातील महायुतीतील अनेक नेत्यांनी मिळून अजित दादाला संपवायची सुपारी घेतली होती व ते त्यांना ठार करण्यात त्यांना यश आले. त्यासाठी मुंबईवरून बारामतीला जाणाऱ्या विमानामध्ये दोन कायम असणारे कॅप्टन साहिल मदन व कॅप्टन यश यांना अचानक त्यादिवशी सुट्टी दिली व त्या ठिकाणी नवीन कॅप्टन साहिल कपूर व संभावी पाठक यांच्या नियंत्रणाखाली विमान टेकअप झालं आधीपासूनच त्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड करून त्यामध्ये ब्रेक फेल करून ठेवले होते त्यामुळे ते विमान लँडिंग करताना ब्रेक न लागल्यामुळे वेगावर वैमानिक नियंत्रण न ठेवता आल्यामुळे ते धावपट्टीवरून इतर ठिकाणी पडले त्यामुळे त्याचा स्फोट होऊन त्यामध्ये असणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे महायुतीतील काही नेते व केंद्रातील काही नेते यांनी मिळून उपमुख्यमंत्री अजित दादा यांना ठार केले.अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या