प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पॅरा हॉलीबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने चौदाव्या नॅशनल पॅरा सीटिंग महिला हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2026 या वर्षाच्या महाराष्ट्र संघाच्या नॅशनल महिला खेळाडूंच्या निवडी नागपूर येथे पार पडल्या . या निवड चाचणीमध्ये सांगली जिल्ह्याच्या दोन दिव्यांग महिलांची निवड झाली आहे. त्यांचे अनुक्रमे नावे कुमारी स्वाती बाळासो भस्मे या राहणार पलूस तालुक्यातील भिलवडी गावच्या रहिवाशी आहेत व जयश्री राजाराम शिंदे राहणार मिरज तालुक्यातील बुधगाव या गावच्या रहिवासी आहेत या दोघीही खेळाडू उत्कृष्ट खेळाडू म्हणून खेळत असून आज त्यांचे नॅशनल महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे. यांना निवडीचे पत्र प्यारा हॉलीबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे सेक्रेटरी राहुल लेकरूवाले तसेच अध्यक्ष नामदेवराव बालघर दादा यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी गुरुदास राऊत जॉइंट सेक्रेटरी दिनेश यादव स्टेट एकलव्य सपोर्ट अवार्ड हे उपस्थित होते या दोघीही सर्वसाधारण कुटुंबातील असून दिव्यांगात्वावर मात करून खेळ क्षेत्रात नामांकित खेळाडू म्हणून आज आपल्या सांगली जिल्ह्याचे नाव देशाच्या पातळीवर नेत आहेत नॅशनल च्या स्पर्धा लवकरच दिल्ली या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या