प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन गावभाग विभागाच्या तक्रार निवारण केंद्र कार्यालयाचे उद्घाटन व बोर्डाचे अनावरण नरवीर शिवा काशिद यांचे थेट *तेरावे वंशज आनंदराव काशीद* यांच्या शुभहस्ते व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशअध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
सुरुवातीस धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले.
यावेळी बोलताना नरवीर शिवा काशीद यांचे वंशज *श्री. आनंदराव काशिद म्हणाले की,* या राज्यात लव्ह जिहाद, धर्मांतरण याच्या विरोधात कायदा करायचा असेल, गड किल्ल्यावरील इस्लामिक अतिक्रमण उध्वस्त करायचे असतील बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून लावायचे असेल तर हिंदू एकता आंदोलनासारख्या आक्रमक संघटनेची हिंदूंना गरज असून हिंदूंनी राज्यातील गावागावात गल्लीबोळात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा काढाव्यात.
*यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* भारताचे शत्रू राष्ट्र पाकिस्तानला मदत करणाऱ्या अमेरिकेच्या वकालतीवर बॉम्ब टाकणारी हिंदू एकता आंदोलन ही आक्रमक संघटना असून बांगलादेशात व पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू आहे आणि हे रोखण्यासाठी हिंदू एकता आंदोलना सारख्या आक्रमक संघटनेमध्ये सभासद व्हा व देशातल्या व देशाबाहेरच्या हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या भगवा झेंड्याखाली एकत्र या.
स्वागत व प्रास्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने यांनी केले, सांगली शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार यांनी आभार मांडले. या कार्यक्रमास ह. भ. प. दीपक नाना केळकर महाराज, पै. प्रदीप निकम, राजू जाधव, रवींद्र सावंत, अवधूत जाधव, हरपित सिंग, सुरज आडीसरे, सुमित शिंगे, आनंदराव चव्हाण, तानाजी फडतरे, गणेश पवार, अनिल मांगले, राजू पवार, उत्तम लोखंडे, प्रशांत पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या