प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विना परवाना अग्निशस्र व जिवंत काडतुस बाळगणारे २ आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.
*आरोपीचे नाव व पत्ता*
१) मार्तड विठ्ठल पवार, वय ३४ वर्षे, रा. मतकुणफी, ता. तासगाव, जि. सांगली.
२) सागर दिपक भोरे, वय ३३ वर्षे, रा. गतकुणकी, ता. तासगाव, जि. सांगली.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकातील पोहेकों / सागर टिंगरे आणि पोहेकों / दरिचा बंडगर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, तासगाव तालुक्यातील मतकुणकी गायात राहणारे मार्तड पयार व सागर भोरे यांचेकडे अग्निशस्व असून ते मणेराजुरी रोडवरील वासुंबे फाटा येथे येणार आहेत,
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मणेराजुरी रोडवरील यांसुबे फाटा ते वासुंचे गावाकडे निगराणी करीता जात असता, ज्ञानसागर अंगणवाडी जवळील ओपन जिगजवळ दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले. लागलीच सपोनि, जयदिप कळेकर यांचे पथकाने त्यांस पळून जाणेची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्यानी त्यांची नावे १) मार्तंड विठ्ठल पवार, यय ३४ वर्षे, रा. मतकुणकी, ता. तासगाव, जि. सांगली. २) सागर दिपक भोरे, वय ३३ वर्षे, रा. मतकुणकी, ता. तासगाव, जि. सांगली असे असल्याचे सांगितले.
सपोनि, जयदिप कळेकर यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगड़ाडती घेतली असता, मार्तंड पवार यांचे कमरेस पाठीमागील चाजुस पॅन्टमध्ये? अग्निशस्व खोचलेले मिळून आले तसेच पेंटचे डाचे खिशात १ जिवंत राऊंड मिळून आले. त्यास सपोनि. जयदिप कळेकर यांनी सदर अग्निशस्व बाळगण्याच्या परवान्याबाचत विचारणा केली असता त्याचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. सपोनि/जयदीप कळेकर यांनी सदरचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) हे कोणाकडून व कशासाठी आणले आहे याबाबत त्यांना विचारणा केली असता, मार्तंड पवार याने सदरचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) हे त्याचे सोबत हजर असले सागर भोरे याने दिले असल्याचे सांगितले. सपोनि जयदिप कळेकर यांनी सागर भोरे यांचेकडे सदरचे अग्निशस्त्र कोणाकडुन आणले याचाबत विचारणा केली असता त्यांने सदरचे अग्निशस्व पुणे येथील अमोल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचेकडून जादा दराने विक्री करणेकरीता मार्तंड पवार वाचेकडे दिले असल्याचे सांगितले.
लागलीच मार्तड पवार याचे कब्जातील अग्निशस्त्र च जिवंत राऊड पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केली आहेत.
सदर आरोपी नंबर (१) ते (२) यांचेविरुध्द पोहेकों / सागर टिंगरे यांनी तासगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शरव अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारचकर यांचे मार्गदशांभाखाली
पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोहेकों / सागर टिंगरे, दरिबा बंडगर, सतिश माने, अमर नरळे, नागेश खरात, सागर लवटे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, अनिल कोळेकर, मच्छिद्र बर्डे, संदिप गुरव, उदयसिंह माळी, महादेव नागणे.
पोशि / विक्रम खोत, केरुबा चच्हाण, चापोहेका / शिवाजी सिद, स्था. गु. अ. शाखा, सांगली.
पोशि / अजय पाटील, अभिजीत पाटील, सायबर पोलीस ठाणे, सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या