प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, विश्रामबाग शाखेला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान शाखाधिकारी श्री. भालचंद्र बक्षी यांनी बँकेची कार्यपद्धती, ग्राहक सेवा, ठेवींचे प्रकार, कर्ज योजना तसेच डिजिटल बँकिंग सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत बँकिंग क्षेत्राविषयी व्यावहारिक माहिती दिली.
या उपक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. बी. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. ए. गुळवणे यांनी केले. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र ब्रम्हनाळकर, प्रा. एन. के. आपटे, प्रा. ए. व्ही. खर्चे, डॉ. एन. टी. कोटकर व प्रा. प्रवीण पारधी यांच्या सहकार्यामुळे ही शैक्षणिक भेट यशस्वीरीत्या पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या