प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित ‘बजेट २०२६’ या भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. वंदना पाटील, प्रा. आदिनाथ कांबळे, प्रा. सौरभ देसाई तसेच प्रा. देवयानी पारगावकर उपस्थित होते.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या भित्तिपत्रकात केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वांगीण विकासासाठीच्या आर्थिक तरतुदी, विविध करप्रणाली, आरोग्य, दळणवळण, शिक्षण, कृषी व सिंचन आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या तरतुदींची सविस्तर माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून, अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमास आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.
या भित्तिपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अर्थसंकल्पाबाबत जागरूकता निर्माण होऊन राष्ट्रीय आर्थिक धोरणांची समज अधिक दृढ होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या