प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या निमित्ताने समृद्ध अॅग्रो फार्म, विठ्ठल पाटील मळा (जुना सावळज–गव्हाण रस्ता), अंजनी येथे गहू बियाणे प्लॉट पाहणी व बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमास तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार मा. श्री. रोहितदादा आर. आर. पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून शेतातील गहू बियाणे प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार रोहितदादा पाटील यांनी, "ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेतातील उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व सुधारित वेगवेगळ्या वाणांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे आमचे प्राधान्य राहील," असा मानस व्यक्त केला.
सदर गहू बियाणे प्लॉटमध्ये उत्तर प्रदेश, वाराणसी येथील गहू संशोधक श्री. प्रकाशसिंह रघुवंशी (बाबाजी) यांनी विकसित केलेल्या “कुदरत अन्नपूर्णा” या देशी (OP) गहू वाणाची लागवड करण्यात आली आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे एक फूट लांब कुडी (ओंबी), भरगच्च दाणे भरण क्षमता तसेच योग्य व्यवस्थापनाखाली एक किलो बियाण्यापासून एक क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता असल्याचे आयोजकांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
कुदरत अन्नपूर्णा हा खपली गव्हासारखी लांबी, चव, गुणधर्म व बाजारभाव असलेला सरळ पद्धतीचा देशी गहू वाण असून त्याचा परिपक्वता कालावधी 130–135 दिवस आहे. एकरी पारंपरिक ४० किलोऐवजी सुमारे २० किलो बियाणे दर, ५–७ वर्षे पुनर्वापराची क्षमता आणि चपातीसाठी उत्कृष्ट गुणवत्ता ही वैशिष्ट्ये असल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.
या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री. ए. एस. फोंडे, मंडल कृषी अधिकारी श्री. आर. जे. पाटील, कृषी अधिकारी पंचायत समिती तासगाव श्री. चंद्रकांत माळी, उपकृषी अधिकारी श्री.जे.जे.चव्हाण, उपकृषी अधिकारी श्री. संजय चव्हाण तसेच कृषी सहाय्यक श्री. आदित्य काटकर उपस्थित होते.
उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बियाणे प्लॉटचे वैज्ञानिक महत्त्व, सेंद्रिय शेतीची गरज, नॅनो युरिया, नॅनो डीएपी तसेच बीजोत्पादन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, याच दिवशी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या स्मृतिदिनी राज्यभरातून हजारो नागरिक अभिवादनासाठी उपस्थित होते. अशा व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमदार रोहितदादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव प्लॉट पाहणीस हजेरी लावली. तसेच अंजनी येथील श्री महादेव मंदिरातील पारायणाच्या सांगता समारंभात सहभागी होत महाशिवरात्रीची बारस सोडली.
यावेळी स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचे द्वितीय बंधू श्री. आर. आर. पाटील (राजू तात्या), निवृत्त पोलीस उपायुक्त, पुणे यांनीही आपले मित्र श्री. विद्याधर गाट सर यांच्यासमवेत गहू बियाणे प्लॉटची पाहणी केली.
यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या अनेक गहू उत्पादक शेतकऱ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रशासकीय सेवेतील अधिकारी, पत्रकार बंधू आणि मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान, या गहू वाणाबाबत उपस्थित शेतकऱ्यांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली असून पुढील हंगामात बियाण्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अंजनी गावचे विद्यमान सरपंच श्री. प्रमोद भाऊ शिंत्रे, माजी सरपंच श्री. रविंद्र अण्णा कोळी, स्व. आर. आर. आबा पाटील ग्राम विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री. संजय अण्णा पाटील, वसंतदादा ग्रेप ग्रोअर सोसायटीचे चेअरमन श्री. विकास पाटील, श्री. केशव पाटील, माजी सरपंच श्री. जयसिंग अप्पा पाटील, श्री. मारुती दादा पाटील, श्री. उत्तम पाटील यांच्या सहकार्याने, तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील शेकडो प्रगतशील गहू उत्पादक शेतकरी व अंजनी–सावळज येथील व्यावसायिक बांधव, अंजनी येथील भाविक ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
_कुदरत देशी गहू बियाण्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क :_
*श्री. दत्तात्रय वि. पाटील, अंजनी*
राज्य प्रवक्ता,
नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य
संस्थापक / एम.डी. — इच्छापूर्ती वधुवर सूचक, सावळज–अंजनी
*📍 समृद्ध अॅग्रो फार्म,*
विठ्ठल पाटील मळा,
जुना सावळज–गव्हाण रस्ता,
अंजनी ता. तासगाव (सांगली) – 416311
*📲 संपर्क : 9096101651*
(सकाळी 9 ते रात्री 8)
➿➿➿➿➿➿➿
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या