प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व शक्ती केंद्रप्रमुख व बूथ केंद्रप्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
आगामी निवडणूक अधिक संघटित, नियोजनबद्ध व प्रभावी पद्धतीने लढवण्यासाठी या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुख व बूथ केंद्रप्रमुख ही निवडणूक यंत्रणेची कणा असून, त्यांच्या जबाबदाऱ्या, कार्यपद्धती व समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले. संघटन अधिक मजबूत करून तळागाळापर्यंत प्रभावी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले व सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा नेते गौतम पवार, भाजपा सांगली जिल्हा युवा अध्यक्ष शांतिनाथ कर्वे, मंडलध्यक्ष रवींद्र वादवणे, भाजपा सांगली जिल्हा शहर सचिव उदय मुळे, स्मिताताई पवार, सांगली जिल्हा शहर कार्यकारणी सदस्य निलेश हिंगमिरे, राजू बावडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या