सांगली प्रतिनिधी : आज सांगली पाटबंधारे मंडळ सांगली येथे माजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन पाणी व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांसह सर्व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये पाणी टंचाई ,दुष्काळ सदृश्य परिस्थिती या विषयावरती शेतकरी आणि अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ,शेतकऱ्यांनी आपल्या भावना मा.खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या.त्यानुसार संजयकाका पाटील यांनी आज वारणाली येथील पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयामध्ये सदर विषयास अनुसरून बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये संजयकाका पाटील यांनी पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या,त्यानुसार शेतकऱ्यांच्या पाण्याच्या बाबतीत असणाऱ्या तीव्र भावना लक्षात घेऊन अधिकारी आणि शेतकऱ्यांचा समन्वय घडवून आणला आणि सदर बैठकीमध्ये काही मुद्दे ठरले ते खालील प्रमाणे:
ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन हे टेल टू हेड म्हणजेच शेवटच्या गावापासून सुरुवात करून लाभक्षेत्रातील सर्व गावांना पाणी देणे ,लाभक्षेत्रातील गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असणारे सर्व तलाव भरणे, सदर योजनेच्या वितरिकेमधून पाणी वितरित करून शेतकरी बांधवांना पाणी उपलब्ध करून देणे.
तसेच विसापूर पुनदी उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी उपलब्ध करून देणे , या योजनेच्या अंतर्गत येणारे सर्व तलाव भरणे,तसेच सावळज लाभक्षेत्रातील अग्रणी नदीमध्ये पाणी सोडून ते बसवेश्वरवाडी पर्यंत पोहोचवणे ,पेड तलावाच्या सांडव्याचे लिकेज काढून त्याची दुरुस्ती करणे, गोटेवाडी येथील इनाम तलाव पाईपलाईन वरती लाईन व्हॉल्व बसवणे व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे .
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत तासगाव व कवठेमंकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील सर्व गावांना शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देणे .
म्हैशाळ उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या मिरज कवठेमंकाळ व जत या तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून येथील शेतकऱ्यांना त्यांचे पशुधन वाचवण्यासाठी मदत करणे.
वरील सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यातील जलसंपदाच्या ताकारी म्हैशाळ व टेंभू योजनेसाठी वर्षभरासाठी जितका पाणीसाठा लागणार आहे तितका पाणीसाठा हा कोयना धरणातील वीज निर्मितीच्या पाण्याच्या बचतीतून उपलब्ध करण्यात यावा
अशा बऱ्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने योजनांचे पाणी आवर्तन टेल टू हेड करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे. पाणी चोरी होऊ नये यासाठी प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी ,जेणेकरून सध्या निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये पिण्याचे पाणी,जनावरांच्या चाऱ्यासाठी त्याची निर्मिती करण्यासाठी या पाण्याची मदत होईल,अशा सर्व बाबींच्या वरती मा. खासदार संजयकाका पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरील विषयांना अनुसरून सूचना केल्या, शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासंदर्भात आव्हान केले, जेणेकरून पाण्याचा गैरवापर होणार नाही त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपणही घ्यावी ,असेही आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले
सदर बैठकीस विलासभाऊ पाटील,सुनीलभाऊ पाटील,शशिकांत जमदाडे, सुनील जाधव, महेश पाटील,प्रमोद शेंडगे, नितीन पाटील, ऋषिकेश बिरने,कृष्णा पाटील, अमित पाटील, प्रकाश खुजट,धर्मेंद्र पाटील, सुरेश पाटील,अंकुश बोबडे, जयसिंग काळे, इंद्रजीत पाटील, दयानंद पाटील, मनोज पाटील, विनोद डूबल,अभिजीत पाटील,सुरज चव्हाण यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव या बैठकीस उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या