प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. १० व ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत २८७ तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.विशेषतः दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्याची ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून पात्र नागरिकांची नवीन मतदार नोंदणी, मयत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता, जन्मतारीख व छायाचित्रातील दुरुस्ती तसेच एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थलांतरित करण्याची कार्यवाही करणार आहेत.ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम न झाल्याने दि. १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनेक नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता या नवमतदारांसह प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनाही नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.नवमतदार तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी १० व ११ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २८७ तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी,मिरज यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या