सांगली : आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे सौदी अरेबिया राष्ट्रीय अध्यक्ष अनुप सिंह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सांगली येथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. युवा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश गायकवाड आणि त्यांच्या टीमच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अनुप सिंह यांचा सत्कार करण्यात आला.
या स्वागत सोहळ्यानंतर महासंघाच्या आगामी सामाजिक उपक्रमांच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सांगली जिल्ह्यातील युवकांना संघटित करणे, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अनुप सिंह यांनी सौदी अरेबियातील मराठा बांधवांच्या कार्याची माहिती दिली. तर जिल्हाध्यक्ष अविनाश गायकवाड आणि त्यांच्या युवा टीमने सांगली जिल्ह्यात युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सादर केली.
या बैठकीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत युवकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे सांगली जिल्ह्यातील संघटनात्मक कार्य अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या