प्रतिष्ठा न्यूज /अनिल शिंदे
सावळज : येथे सावळसिध्द विकास सोसायटी व एस क्यू एम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक द्राक्षतज्ञ श्री जुआन पाल्मा मेंडोझा (ग्लोबल ग्रेप एक्सपर्ट फ्रॉम चिले) यांचे द्राक्ष शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले
आहे सदरचे मार्गदर्शन व चर्चासत्र सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सावळज येथील सावळसिध्द विकास सोसायटीच्या मुख्य सभागृहात होणार आहे या चर्चासत्रात भारतामध्ये नव्याने आलेल्या द्राक्ष जातीसाठी पोषण व्यवस्थापणावरील जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व नवीन प्रगती जाणून घेण्यासाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे तरी सावळज व परिसरातील सर्व द्राक्षबागायतदार बंधूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सावळसिध्द विकास सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या