प्रतिष्ठा न्यूज | प्रतिनिधी
सांगली : नवरात्रीनिमित्त गवळी गल्ली येथील शिवसमर्थ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित देवीपूजा व आरती कार्यक्रमासाठी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी देशाची सुरक्षा, सामाजिक शांतता आणि घुसखोरीच्या मुद्द्यावर भाष्य करत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, फ्रान्समधील हिंसाचाराच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानेही देशाच्या सुरक्षेसंदर्भातील आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. घुसखोरी रोखण्यात अपयश आले आणि मतांच्या राजकारणासाठी तुष्टीकरणाचे धोरण राबवले गेले, तर भविष्यात गंभीर सामाजिक आणि राजकीय परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
भारतामध्येही बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत, देशाची सुरक्षा आणि शांतता टिकवण्यासाठी नागरिकांनी सजग राहिले पाहिजे, असे शिंदे यांनी नमूद केले. देशासमोरील आव्हाने ओळखून प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्त्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, अनिकेत बर्गे, ईशांत पठाडे, पियुष घाग, किरण जगताप, अजिंक्य बर्गे, प्रदीप भोसले, महेश धुमाळ, अनिकेत जाधव, विकास सोनवणे, ओमकार वाडीकर, रोहित लंगडे, विनायक जगताप, कौशिक गवळी, धनंजय गवळी आणि समर्थ जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात देशाची सुरक्षा, घुसखोरीचा प्रश्न आणि सामाजिक जागरूकता या विषयांवर नितीन शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या