प्रतिष्ठा न्यूज | किरण कुंभार
तासगाव:तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वराज्य फाउंडेशन व पी.जी. स्पोर्ट्स, तासगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.या यशाच्या जोरावर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.अंडर-१४ मुलांच्या गटात समरजीत शिंत्रे याने ४०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर लांब उडीत तृतीय क्रमांक मिळवला. वरद कोळेकर याने लांब उडी व ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.समर्थ गेळे याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.अंडर-१७ मुलींच्या गटात वर्षा माने हिने १०० मीटर धावणे, लांब उडी व १०० मीटर हार्डल्स या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.वैष्णवी माने हिने २०० मीटर धावणे, ४०० मीटर हार्डल्स व ट्रिपल जंपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.राही सूर्यवंशी हिने १०० मीटर हार्डल्स, ४०० मीटर धावणे व लांब उडी या प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवला.अंडर-१७ मुलींच्या ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत वैष्णवी पाटील,संस्कृती मगदूम,वर्षा माने व प्रणाली भंडारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अंडर-१९ गटात श्रेया पवार हिने २०० व १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक,आकांक्षा गायकवाड हिने हातोडाफेकमध्ये प्रथम क्रमांक, तर सुदीक्षा काटकर हिने ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. श्रावणी माने हिने १५०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक, तर अंडर-१९ मुलांच्या गटात आर्यन बिरनाळे याने ४०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावला.या सर्व खेळाडूंना क्रीडा अधिकारी सीमा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच खेळाडूंचे प्रशिक्षक पवन घोडके सर यांनी त्यांना नियमित सराव व योग्य प्रशिक्षण दिले. विद्यानिकेतन शाळेचे शहाजी खरमाटे सर यांचेही मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष किरण माने,संचालक गुंडू थोरबोले,अभिजीत कोळेकर, सचिन सूर्यवंशी यांच्यासह सर्व संचालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.खेळाडूंनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करून तासगावचे नाव जिल्हा व राज्यस्तरावर उज्ज्वल करावे,अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या