प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : जिल्ह्यातील इंडी येथे घराच्या छतावर असलेल्या लोखंडी रॉडवर पाय ठेवताना तोल जाऊन विजेच्या तारांवर पडल्याने वीजेचा धक्का लागून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना घडली आहे.
अब्दुल सत्तार शहाबुद्दीन गौंडी (वय ४५, रा. इंडी, गोदावन गल्ली) असे मृताचे नाव आहे. ते भुय्यार येथील गंगप्पा सोमण्णा मादर यांच्या घराच्या छतावरील लोखंडी रॉडवर पाय ठेवत असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यानंतर ते घरावरून गेलेल्या वीजवाहिनीच्या तारांवर पडल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.याबाबत मृताची पत्नी नजमाबेगम अब्दुल सत्तार गौंडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या