प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : डि . वाय. पाटील युनिव्हर्सिटी , तळसंदे चे प्रा. शंकर इंदुबाई सूर्याप्पा पुजारी यांना नुकतीच डि . वाय. पाटील युनिव्हर्सिटी , तळसंदे यांचे कडून कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विषयामध्ये पीएच .डी हि मानाची पदवी प्राप्त झाली. " प्रिसिजन एग्रीकल्चर युजिंग वायरलेस सेन्सर नेटवर्क : ए कॉन्टॅस्ट बेस्ड अप्रोच टू बनाना प्लांट ". हा त्यांचा पीएच .डी चा मुख्य विषय होता . या साठी त्यांना त्यांचे पीएच .डी मार्गदर्शक डॉक्टर जयदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . प्राध्यापक शंकर पुजारी हे सध्या डी वाय पाटील युनिव्हर्सिटी,तळसंदे येथे ऍडमिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
या संशोधना संबंधित सांगताना प्राध्यापक पुजारी म्हणाले की शेती हा व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या 18% जीडीपी या शेतीवर वर आधारित आहे. भारतीय शेतकरी काबाड कष्ट करायला तयार आहे परंतु त्याच्या कष्टाच्या मानाने त्याला शेतीपासून इन्कम मिळत नाही. संगणकाच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या त्यासाठी काय उपयोग करता येतो का या उद्देशाने अद्यावत अशा संगणक प्रणालीचा शेतीपूरक व्यवसायासाठी काय उपयोग करता येतो का याबाबत अभ्यास करून आपला प्रबंध सादर केला. यामध्ये हवामानाचा केळीच्या पिकावर होणारा परिणाम तसेच त्याबाबत घ्यावयाची काळजी आणि केळी पिकाच्या वाढीनुसार त्याला द्यावे लागणारे खते तसेच हवामानामध्ये काही बदल झाल्यास त्याची पूर्वसूचना मोबाईलद्वारे शेतकऱ्याला दिली जाते त्यानुसार शेतकरी आपल्या पिकाची काळजी योग्य ते कीटकनाशक वापरून एखादा रोग येण्यापूर्वी घेऊ शकतो यामुळे त्याचे रोगामुळे होणारे नुकसान कमी होते व एकूण उत्पादन वाढते. केळी पिकाबाबत हवामानाबाबत तसेच कीटकनाशक वापरण्याबाबत सर्व माहिती शेतकऱ्याला मोबाईल द्वारे मिळत असल्यामुळे काही कारणास्तव शेतकरी बाहेरगावी जरी असला तरी त्याला सर्व माहिती मोबाईलच्या साह्याने मिळते त्यानुसार शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेऊ शकतो. तसेच ही माहिती विविध भाषेमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे त्याचा उपयोग विविध राज्यातील शेतकऱ्यांना होईल. यासाठी अनेक कृषी तज्ज्ञांच्या कडून केळी पिका संबंधित माहिती घेऊन सदरचा प्रोजेक्ट करण्यात आला आहे. डॉक्टर शंकर पुजारी यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ९ हुन अधिक शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाराष्ट्र बरोबरच गोवा या ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे.
त्यानी शालेय शिक्षण जि . प. शाळा कुंभोज व न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज , उच्च माध्यमिक शिक्षण संभाजीराव माने जुनिअर कॉलेज , रुकडी तर डिप्लोमा इन कॉम्पुटर इंजिनीरिंग ICRE गारगोटी , अभियांत्रिकी पदवी शिक्षण संजीवन इंजिनीरिंग कॉलेज , पन्हाळा त्यानंतर त्यांनी एम . टेक इन कॉम्पुटर नेटवर्क हि पदवीत्तर पदवी पुणे विद्यापीठ मधून पूर्ण केले व डी . वाय . पाटील विद्यापीठातून आपले पीएच .डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
पीएच .डी साठी शासकीय एग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूर, सीमा बायोटेक तळसंदे, एग्रीकल्चर कॉलेज तळसंदे त्यांच्याकडूनही त्यांना या बाबत मार्गदर्शन मिळाले . यासाठी डी वाय पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील , ट्रस्टी ऋतुराज पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए. के. गुप्ता सर , रजिस्टार डॉक्टर जे. ए. खोत सर, डायरेक्टर अकॅडमीक्स डॉक्टर संग्राम पाटील सर , सुजित सरनाईक सर, परीक्षा प्रमुख डॉक्टर गुरुनाथ मोटे सर, डॉक्टर मुरली भूपती सर तसेच डॉक्टर शंकर पुजारी यांच्या संपूर्ण कुटुंबांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या