गगनबावडा: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा लोकशाही, समाजवाद आणि आत्मनिर्भरता यांच्यावर दृढ विश्वास होता, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले. ते आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे संचलित, पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
त्यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात देशासमोर नवी आव्हाने उभी होती. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी नवीन अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरण, शिक्षण व विज्ञान क्षेत्राला चालना दिली. कृषी व्यवस्थापन आणि सिंचन योजना राबवण्यात पुढाकार घेतला, तसेच विदेश नीती व अलिप्ततावादी चळवळ याबाबत देशाला नवी दिशा दिली.
प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण:
कार्तिक पौर्णिमा तथा बालदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. संदीप पानारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली व प्रतिमा पूजन करण्यात आले.
मान्यवरांचा सहभाग व मार्गदर्शन:
प्रास्ताविक: उपप्राचार्य डॉ. संदीप पानारी
आभार प्रदर्शन: इतिहास विभाग प्रमुख प्रा. अरुण गावकर
मार्गदर्शन: संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. सतीश देसाई व संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
उपस्थिती: सदर कार्यक्रमात विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सौरभ देसाई, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. हुसेन फरास, प्रशासकीय सेवक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या