सांगली प्रतिनिधी : सांगली कॉलेज कॉर्नर ते कुमठे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे कलानगर-माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बायपासकडून येणारी वाहने तसेच माधवनगरकडे जाणारी वाहने यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने या ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दररोज 7 ते 8 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत असून, इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी या पोलिसांची आवश्यकता आहे.
रस्त्याचे काम पूर्ण करण्यास एवढा विलंब का होत आहे? ठेकेदाराकडून काम संथगतीने का सुरू आहे? याची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करावी व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत.
तसेच, कोट्यावधीचा रस्त्याचा कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराच्या कामातील विलंबामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, सदर ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी ठेकेदाराने स्वखर्चाने खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. त्यामुळे या ठिकाणी नियुक्त असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी तैनात करता येईल.
आमच्या प्रमुख मागण्या :
१. कलानगर-माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
२. रस्त्याचे काम पूर्ण होण्यास झालेल्या विलंबाची प्रशासनाने चौकशी करावी.
३. काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराने स्वखर्चाने खासगी सुरक्षा रक्षक नेमून वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी.
४. या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून तैनात असलेल्या 7 ते 8 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना इतर गर्दीच्या व आवश्यक ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी नियुक्त करावे.
५. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी.
नागरिकांना विनाकारण वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये आणि प्रशासनाचा तसेच वाहतूक पोलिसांचा अनावश्यक ताण कमी व्हावा, यासाठी हिंदू एकता आंदोलन संघटना, सांगली जिल्हा यांच्यावतीने ही मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल.
असे आवाहन हिंदू एकता आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, दिग्विजय शिंदे, हारपितशिंग गौड, अनिकेत अंम्बरूळे, सुजित पाटील, सुमित शिंगे,
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या