सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रथमच दीवाळी निमित्त टिळक स्मारक मंदिर, टिळक चौक सांगली येथे फराळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे मार्गदर्शक जेष्ठ नेते विजयदादा कडणे यांनी केले.
यावेळी बोलताना मनोज साळुंखे म्हणाले की, दीपावली फराळ पार्टी आयोजित करण्यामागचा उद्देश व पुढील वर्षापासून संपूर्ण राज्यात दिवाळी फराळ पार्टीच आयोजन करण्याचा संकल्प हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्याचा आहे. जेणेकरून हिंदूना लाज वाटून इफ्तार पार्टीला जाणार नाहीत.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, दिवाळीच्या वेळी सांगली शहरातील गणपती मंदिर जवळ एकही मुस्लिम नेता भगवी टोपी घालून हिंदूना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला येत नाही. परंतु आपले हिंदू रमजान ईदला शुभेच्छा देण्यासाठी इदगाह मैदानासमोर बिना बोलवता डोक्यावर मुस्लिम टोपी घालून मतासाठी मुस्लिमांना शुभेच्छा देन्यासाठी जातात. तसेच मुस्लिमाच्या इफ्त्यार पार्टीला हिंदू उपस्थित राहून एकमेकांना खजूर भरवतात. परंतु मुस्लिम कधीही हिंदू धर्मातील सर्वात मोठा सन दिवाळी निमित्त दिवाळी पार्टीचे आयोजन करून हिंदू ना चकली/ लाडू भरवत नाहीत. याचा जाब इफ्तार पार्टीला जाणाऱ्या आणि ईदगाह मैदानावर शुभेच्छा देणार्या हिंदूंना विचारा. आणि हिंदूंनो आता इफत्यार पार्टी नाही दिवाळी फराळ पार्टी. दरवर्षी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने दिवाळी फराळ पार्टीचे आयोजन करणार.
यावेळी आभार हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार यांनी मानले.
यावेळी रा.स्व संघाचे माधवराव कुलकर्णी, पंडितराव बोराडे, रावसाहेब खोजगे, श्रीकांत शिंदे, तानाजी शिंदे, विजय कडणे, मनुभाई सारडा, प्रदीप बोथरा, प्रसाद रिसवडे, पै. प्रदीप निकम, राजू जाधव, दत्ता भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, दिग्विजय शिंदे, हारपितसिंग गौड, अंकुश जाधव, शिवाजी पाटील, प्रफुल चव्हाण, सतीश बल्लाळ, अभिमन्यू भोसले, हरी पाठनकर, अनिकेत अंबरुळे, शुभम देसाई, रवींद्र वादवने, प्रेम देसाई, अनिकेत कुंभार, सुजित पाटील, शुभम पाटील, प्रथमेश खिलारे आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या