प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : भारतीय जनता पक्षाच्या विजयपूर जिल्हा घटकातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी यांनी या नियुक्त्यांचे आदेश जारी केले.
जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभुगौड बिरादार अस्की, एस. ए. पाटील, शिल्पा कुदरकोंड, भीमाशंकर बिरादार, बसवराज बिरादार, शंकरगौड पाटील आणि परशुरामसिंग रजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा सचिवपदी कृष्णा गुन्नाळकर, राजेश तावसे, रमेश बिदनूर, मल्लिकार्जुन किवडे, शरणू माताळी, राजशेखर डोळी आणि उमेश वंदाल यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच जिल्हा कोषाध्यक्षपदी भीमाशंकर हदनूर, जिल्हा कार्यालय सचिवपदी शरणबसप्पा कुंभार आणि जिल्हा माध्यम प्रमुखपदी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या