प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) : भारतीय विकास पर्वाची तपपुर्ती, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालास १२ वर्षे पूर्ण झाली. या काळात त्यांच्या नेतृत्वात युती सरकारने घेतलेल्या १२ लोकप्रिय योजनांवर आधारित मराठी दिनदर्शिका भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारली गेली. त्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आदी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते.
देशात २०१४ साली ऐतिहासिक सत्तांतर झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी पंतप्रधान म्हणून १२ वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला. त्यात त्यांनी देशातील सामान्य नागरिकाचे आयुष्य सुखकर करणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यात डिजीटल इंडिया, थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करणारी योजना, महिलांना धुरमुक्त करण्यासाठी उज्वला गॅस योजना, आत्मनिर्भर भारताची संकल्पना सत्तयात उतरवणारी मेक इन इंडिया योजना, आयुष्यमान भारत योजनेतून सर्व भारतीयांना आरोग्य वीमा संरक्षण अशा योजना अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक आनंददायी, सुरक्षीत करण्यासाठी केलेले काम लक्षवेधी आहे. प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न साकार होत आहे. अशा बारा योजनांवर आधारित दिनदर्शिका मराठी भाषेतील काढण्याची संकल्पना पृथ्वीराज पाटील यांनी आकाराला आणली. तिचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘सक्षम भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या बारा वर्षात देशात विकासात्मक झालेले बदल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची उजळलेली प्रतिमा यावर आधारीत ही दिनदर्शिका आहे.’’
यावेळी आमदार निरंजन डावखरे, मुंबई भाजपा प्रवक्ते व नगरसेवक नवनाथ बन, विरेंद्र पाटील, सनी धोतरे, प्रकाश पाटील, सागर खोत, अजय देशमुख, बिपीन कदम आदी प्रमुख उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या