विजयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेल्या बचत, आर्थिक शिस्त आणि उत्तम जीवनशैली अंगीकारण्याच्या संदेशाला विजयपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाने अनावश्यक खर्चाला आळा घालून बचतीची सवय अंगीकारणे ही आजच्या काळाची गरज आहे. कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेता बचतीला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला हा संदेश सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे खासदार जिगजिणगी यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांत देशातील गरिबी निर्मूलन आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने विविध विकासात्मक योजना राबविल्या आहेत. 2011 ते 2023 या कालावधीत सुमारे 50 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले, ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचबरोबर देशातील युवा पिढीने अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही खासदार जिगजिणगी यांनी केले. देशाचे भविष्य असलेल्या युवा शक्तीला योग्य दिशेने मार्गदर्शन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचत, आर्थिक शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावा. आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार रमेश जिगजिणगी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या