सांगली : चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूर्वा पोंक्षे हिची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या महिला व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही स्पर्धा दि. १६ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत स्वरनेम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ, वडोदरा (गुजरात) येथे होणार आहे.
पूर्वा पोंक्षे हिच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांच्या हस्ते तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक श्रीमती संपदा शिंदे व पर्यवेक्षक श्री. चैतन्य कुलकर्णी उपस्थित होते.
पूर्वाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने व श्री. दत्तात्रय मुळुक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य श्री. नारायण आपटे, डॉ. आशिष पुराणिक आणि जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. शार्दूल ठाकूर यांचे सहकार्य लाभले.
पूर्वाच्या या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून तिचे अभिनंदन होत असून आगामी स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या