प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 16 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयामार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे शुक्रवार, दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत, "प्लेसमेंट ड्राईव्हचे" आयोजन करण्यात आले आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जव्हेरी, (PNG) सांगली यांच्याकडील सेल्स एक्झीकेटीव्ह 40, कस्टमर रिलेशनशीन एक्झीकेटीव्ह 10, अॅडव्हर्टायझमेंट एक्झीकेटीव्ह 10, शिपाई 5 इत्यादी पदांची 65 जागांसाठींची भरती आहे. या पदांसाठी वयोमर्यादा किमान 20 ते कमाल 35 असणार आहे. दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, एम.बी.ए या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.
शुक्रवार, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी, सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे प्रत्यक्ष मुलाखतीस येताना, सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी (दूरध्वनी क्रमांक ०२३३ २९९०३८३) संप
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या