प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भगवान दत्तात्रेयांच्या नऊ स्तोत्रांसह भक्तिपर साहित्याचा समावेश असलेल्या ‘दत्तपाठ’ पुस्तिकेची तिसरी आवृत्ती गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. अवघ्या सहा महिन्यांत ८ हजार प्रती प्रकाशित झाल्याने भाविकांमध्ये दत्तपाठाविषयीची वाढती अभिरुची अधोरेखित झाली आहे.भगवान दत्तात्रेयांच्या चरणचिन्हांची पूजा केल्यानंतर झालेल्या प्रकाशनप्रसंगी परमात्मराज महाराज म्हणाले की, भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप विविध धर्मसंप्रदायांच्या दृष्टिकोनातून समन्वयाचे प्रतीक असल्याने त्यांच्या स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिसाहित्याच्या वाचनाकडे भाविकांचा कल वाढत आहे. अनेक भाविक नातेवाईक व इष्टमित्रांना दत्तपाठाच्या प्रती भेट देत असल्याने मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी श्री देवीदास महाराज, श्री नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रीधर महाराज, शिवाजी लोखंडे, मल्लेश बन्ने, राजकुमार पाटील आडी, पोकळे बंधू कागल, बाळासो पाटील हंचिनाळ, कृष्णात पाटील कोगनोळी, उदय मोनाप कोगनोळी, अविनाश पाटील हंचिनाळ, पुंडलिक कुंभार रासाई शेंडूर, मारुती संकपाळ कागल, राजाराम पाटील शंकरवाडी यांच्यासह आडी, सौंदलगा, कोगनोळी, हणबरवाडी, बेनाडी, हंचिनाळ, सुळकूड, म्हाकवे, आणूर, हमिदवाडा, निपाणी, नांगनूर, कागल, कोल्हापूर आदी गावांतील भाविक व आश्रमस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या