गगनबावडा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यात यंदा एकूण ९६ सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी १३ गावांनी 'एक गाव, एक गणपती' उपक्रम राबवून सामाजिक एकोपा आणि शांततेचा संदेश दिला आहे.
गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. उत्सवाच्या काळात शांततेला बाधा पोहोचू नये म्हणून तालुक्यातील १६ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, ध्वनिप्रदूषण टाळावे आणि सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक भारत साळोखे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या