पलूस प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संभाव्य उमेदवार भैय्या माने यांनी पलूस येथे भेट देत पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयास भेट दिली.
यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. पलूस तालुक्यातील पात्र पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन भैय्या माने यांनी केले.
यावेळी विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भैय्या माने म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतदार नोंदणीला विशेष महत्त्व आहे. पात्र पदवीधरांनी आपली नोंदणी वेळेत करून घ्यावी. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, पलूस परिसरातील पात्र पदवीधरांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील. मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करून भैय्या माने यांचा विजय निश्चित करण्यासाठी एकजुटीने काम करू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या