प्रतिष्ठा न्यूज /दोंडाईचा
दोंडाईचा येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींनी आर.डी.एम.पी. हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा केला. यावेळी हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रा.अमृता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. रेवती बागुल यांनी प्रेमचंद यांच्या साहित्यिक कार्यासह हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. मुख्याध्यापक एस. के. चंदाने यांनी अध्यक्षीय मनोगतातून हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.रूपाली बागुल यांनी सूत्रसंचालन, तर निकीता रावल यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे व प्रा. पी. डी. बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात तृष्णाली गोसावी, दीपमाला भामरे, संगीता पाटील, राजश्री राजपूत, पुष्पांजली गावित, ईश्वरी ठाकरे, छाया पाटील व रत्ना इंदवे यांनी सहभाग घेतला. आर.डी.एम.पी. हायस्कूलमधील शिक्षक व प्रशासकीय सेवकांचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या