प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची प्रथम बैठक तहसील कार्यालय, तासगाव येथे आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावरील जन आरोग्य समित्यांच्या कामकाजावर सनियंत्रण ठेवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.बैठकीस तहसीलदार अतुल पाटोळे, पंचायत समिती सभापती अरुणा पाटील, सिंधुताई गजानन पाटील, नगराध्यक्ष विजया बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य अविराज पाटील, विजय धेंडे, मोहन पाटील, अमित पाटील, शशिकांत जमदाडे, संजय बनसोडे, गटविकास अधिकारी सुयश व्हनमाने, उल्हास भांगे तसेच जिल्हा माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल करांडे व डॉ. सतीश कोळेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा, तर डॉ. बिभीषण सारंगकर व डॉ. अजय भोसेकर यांनी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचा सविस्तर आढावा सादर केला. दोन्ही तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.आमदार रोहितदादा पाटील यांनी मतदारसंघातील आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना आरोग्यसेवेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या