प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट) संलग्न युवासेनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष (सांगली विधानसभा, मिरज विधानसभा) पदावर विशाल तानाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश (परिष) प्रताप सरनाईक यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
नियुक्तीपत्रानुसार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विशाल पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत सांगली व मिरज विधानसभा क्षेत्रात युवासेना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नियुक्तीबद्दल शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विशाल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वात संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निवडीबद्दल विशाल पाटील यांचा विश्राम बाग येथील शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक सहप्रमुख रावसाहेब घेवारे, संपर्क प्रमुख महादेव सावंत, शिवसेना सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे, युवा सेना तासगाव नंदू मंडले, युवा सेना मिरज तालुकाप्रमुख मयूर गायकवाड उपस्थित होते.
नियुक्तीपत्रावर तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
विशाल पाटील यांच्या नियुक्तीपत्रावर युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या असून, सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या