सांगली, प्रतिनिधी : जय जोहार आदिवासी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन, सांगली यांच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक आदिवासी संस्कृतीच्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. "आमची संस्कृती, आमचा अभिमान" या संकल्पनेवर आधारित हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सांगलीवाडी येथील जिजाई मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याध्यक्ष मा. श्री. सीताराम भौरले यांच्या हस्ते होणार असून,अध्यक्षस्थानी मा. श्री. संजय खाडे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष मा. श्री. रोहिदास कोळपे, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.), तर प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री शत्रुघ्न भांगरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सुप्रसिद्ध आदिवासी गायक रामनाथ बुरूड यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
या सोहळ्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक नृत्य, लोककला, सांस्कृतिक आहे. कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्यभरातील आदिवासी समाजातीलपदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
जिल्हाध्यक्ष इंदरचंद साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असून, सांगली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले जपत "आदिवासी संस्कृतीचा अभिमान एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा सांगलीच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणार आहे."
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या