सांगली, प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड शासकीय विश्रामगृह, सांगली येथे समस्त मातंग समाज, सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित बैठकीत करण्यात आली. दलित मित्र पुरस्कार प्राप्त अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यापूर्वी २१ जून रोजी अध्यक्षपदी एकमताने निवड झालेल्या अभिमन्यू भोसले यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
बैठकीची प्रस्तावना प्रशांत सदामते यांनी केली. समितीच्या उपाध्यक्षपदी प्रशांत जायनावर, ग्रामीण उपाध्यक्षपदी मनोज सदामते, कार्याध्यक्षपदी अशोक कसबे, सचिवपदी श्रीकांत लोखंडे, खजिनदारपदी जितेंद्र हेगडे, सहसचिवपदी संजय लोखंडे यांची निवड करण्यात आली. तसेच प्रशांत सदामते, विकास आवळे, प्रमोद मोरे, अक्षय कांबळे, प्रीतिराज सकट, रोहित चौगुले, अमोल सदामते आणि विलास कांबळे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी जयंती महोत्सवासाठी स्वतंत्र सल्लागार समितीही स्थापन करण्यात आली. या समितीत संदीप तात्या ठोंबरे, अशोक पवार, अर्जुन कांबळे, आतांबर सौंदडे, भगवान लोंढे, बाळासो भंडारे, राजू मगदूम, अनिल सदामते, सयाजी सकट, आशा पवार, बंडू केंगार आणि चरण चौगुले यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला समर्थन व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष अभिमन्यू भोसले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मातंग समाजाचे नेते संदीप तात्या ठोंबरे यांनी मार्गदर्शन करत समाज संघटन व सामाजिक ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. बैठकीनंतर उपस्थितांनी पुष्पराज चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी केली. यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश दादा चव्हाण यांनीही समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अशोक पवार, प्रशांत सदामते, संदीप ठोंबरे, अभिमन्यू भोसले, अर्जुन कांबळे, आतांबर सौंदडे, जितेंद्र हेगडे, अशोक कसबे, श्रीकांत लोखंडे, आशा पवार, सयाजी सकट, संजय लोखंडे, प्रमोद मोरे, अनिल सदामते, मनोज सदामते, राजू सदामते, भगवान लोंढे, विकास आवळे, राजू मगदूम, अक्षय कांबळे, विलास कांबळे, प्रशांत जायनावर, सचिन ऐवळे, प्रीतिराज सकट यांच्यासह मातंग समाजातील अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या