तासगाव : तासगाव येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ लिफ्ट बसविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे
निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तासगाव तहसील कार्यालयाची इमारत जी+२ मजली असून तहसीलदार, पुरवठा विभाग, निराधार योजना कार्यालय तसेच कृषी व वन विभागाची विविध कार्यालये वरच्या मजल्यांवर कार्यरत आहेत. त्यामुळे शासकीय कामानिमित्त येणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच आजारी नागरिकांना जिने चढ-उतार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यापूर्वीही अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तहसील कार्यालयात तातडीने लिफ्ट (उद्वाहक) बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे सांगली उपजिल्हाप्रमुख प्रदीप (काका) माने-पाटील आणि तासगाव तालुका शिवसेनेचे संजय लक्ष्मण पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या