सांगली, प्रतिनिधी : केपीज चेस अकॅडेमीतर्फे तसेच मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड जव्हेरी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित गुरुवर्य स्व. कुमार पांडुरंग माने बुद्धिबळ महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कच्छी जैन भवन, सांगली येथे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील व सुप्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले होते.
यावेळी माजी नगरसेवक उदय पवार, डॉ. उमा दातार-चौगुले (राधेय फाउंडेशन), स्पर्धा संचालक इंजि. नितीन माने, उद्योजक निखिल पाटील, डॉ. अमोल चौगुले, आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर तसेच केपीज चेस अकॅडेमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजयकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बुद्धिबळ महोत्सवात ९ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि खुल्या गटातील अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह विविध भागांतील तब्बल ३५३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विविध गटांमध्ये २२० हून अधिक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
९ वर्षांखालील गटात कोल्हापूरच्या अथर्वराज ढोलेने विजेतेपद पटकावले. आदिराज डोईजड उपविजेता ठरला, तर शिवराज कामते याने तिसरा क्रमांक मिळविला. अनिरुद्ध साळुंखे, हर्षा क्षीरसागर, केशव कौशिक, नक्षत्रा कांबळे, आरव पाटील, विवान परांजपे व सुयोग काकानी यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. सात वर्षांखालील गटात रुहान अत्तार, स्वराज धामणीकर व वीर गाडा यांनी यश संपादन केले. मुलींच्या गटात परी पाटील, अवनी उपाध्ये व स्वरांजली पाटील यांचा गौरव करण्यात आला.
१३ वर्षांखालील गटात मिरजेच्या वरद पाटीलने विजेतेपद मिळविले. वेदांत बांगड (इचलकरंजी) उपविजेता, तर प्रसेंजित जांभळे (लातूर) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. अर्णव पोर्लेकर, अर्णव रहतवाल, रुचित मुके, वंशिल ठक्कर, शौर्य गाडा, प्रभाकर बाडीगर व सहर्ष टोकले यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अकरा वर्षांखालील गटात पृथा ठोंबरे, हिमांशू व्हनगावडे व विवान अस्पटवार यांनी यश मिळविले. मुलींच्या गटात माधवी देशपांडे, आरोही बनसोडे व नारायणी घोरपडे यांचा गौरव करण्यात आला.
खुल्या गटात कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने विजेतेपद पटकावले. सांगलीच्या आदित्य चव्हाणने उपविजेतेपद, तर मिरजेच्या अभिषेक पाटीलने तृतीय क्रमांक मिळविला. अरीन कुलकर्णी, विक्रमादित्य चव्हाण, विवान सोनी, ओमकार सावर्डेकर, ईश्वरी जगदाळे, रिया लाहोटी, रवींद्र निकम, प्रशांत अनवेकर व सचिन पूजेरी यांनीही पारितोषिके मिळविली.
ज्येष्ठ खेळाडू गटात राजीव कोल्हटकर व सतीशकुमार माने, महिला गटात संस्कृती सुतार, सृष्टी पोवार व अरिना मोदी, इतर राज्य गटात रितेश मुचंडीकर, अंशुमन शेवाडे, पृथ्वीराज पाटील व बाळासाहेब चोळके, महाराष्ट्र गटात सौमित्र केळकर, शर्विल येडेकर, स्पर्श लव्हाळे, प्रवीण सावर्डेकर व प्रणव मोरे, तर सांगली गटात अमोघ शेंडगे, अश्विनी निकम व धनाजी जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिके पटकावली.
स्पर्धेचे पंच म्हणून आरती मोदी, करण परीट, शाहरुख कुरणे, रोहिणी तुम्मा, सूर्याजी भोसले, नाझिया पटेल, शंकर आडम, नितीन माने, ईश्वर जांभळे, सपना उपळावीकर, पूजा धनवडे, अनिता भोसले, अरुणा पुराणिक, सुचिता देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर व विजयकुमार माने यांनी उत्कृष्टरीत्या जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळाला अशा स्पर्धांमुळे मोठी चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या