सांगली दि. १०:- महाराष्ट्र ॲमॅच्युअर जिमनॅस्टिक असोसिएशन व सांगली जिल्हा ॲमॅच्युअर जिमनॅस्टिक्स असोसिएशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज तालुका क्रीडा संकूल, मिरज या ठिकाणी राज्य अॅक्रोबेटिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेची निवड स्पर्धा दिनांक २५ जुलै २०२६ या रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत मिरज तालुका क्रीडा संकूल प्रशिक्षण केंद्रामधील १० खेळाडूंनी चित्तथरारक व उच्च कामगिरी केली. यामध्ये मेन्स पेअर, मिक्सपेअर, मेन्सगृप, उमेन्सगृप या खेळप्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत मिरज तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रामधील श्री. निरंजन भोसले, श्री. वरद बसरगे, श्री. अभिषेक हारगे, श्री. यश पाटील यांनी मेन्सगृप मध्ये तर श्री. ज्ञानेश हजारे, श्री. अनिकेत हारगे, श्री. हर्षवर्धन मोहिते, प्रणव पवार यांनी प्रियुथ मध्ये आणि श्री. आर्यन हारगे, कु. आदिती हारगे यांनी मिक्स पेअर या खेळप्रकारात सहभाग घेऊन नेत्रदिपक व अव्वल दर्जाची कामगिरी करून दाखवून सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या कामगिरी मुळेच त्यांची दिनांक ०१ ते ०३ ऑगष्ट २०२६ मैसूर (Mysuru, Karnataka,) येथे होणाऱ्या राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धसाठी निवड झाली आहे.
सदर मार्गदर्शक व खेळाडूंची निवड झाल्याबद्दल मा. आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांनी सर्व खेळाडूंना गुलाब पुष्प देवून सत्कार करून अव्वल दर्जाची चांगली कामगिरी करून दाखवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मिरज तालुका क्रीडा संकूलात खेळाडूंच्या सरावासाठी ४० लाखाचे साहित्य दिलेले आहे.
त्यांना संघटनेचे सचिव श्री. दिपक सावंत, श्री. हेमंत सावंत, श्री. सुमित सावंत, काजल काळे यांचे मार्गदर्शन मिळत असून संघटनेचे अध्यक्ष मा. गौतम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. किरण बोरवडेकर, खजिनदार व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. बापूसाहेब समलेवाले, भानु तालिम संस्थेचे सचिव श्री. गिरीष भट, क्रीडा मार्गदर्शक सौ. आरती हळगली यांचे प्रोत्साहन मिळत असून मा. नामदार सुरेश (भाऊ) खाडे पालकमंत्री व कामगार मंत्री यांचे आर्थिक पाठबळ मिळत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या