आष्टा प्रतिनिधी : मिरजवाडी (ता. वाळवा) येथे लोककल्प फाऊंडेशनच्या वतीने दि. ३० जून २०२६ रोजी मिरजवाडी ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण १०० लाभार्थींनी आरोग्य तपासणी व आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
आरोग्य तपासणीनंतर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रादेशिक मार्केटिंग व्यवस्थापक सूरज पाटील यांनी लोककल्प फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत आरोग्य जनजागृतीचे महत्त्व आणि नियमित आरोग्य तपासणीची गरज याविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर उषःकाल हॉस्पिटल, सांगलीच्या डीएमओ डॉ. मिसबा गवंडी यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, संतुलित आहाराचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.तर्फे प्रादेशिक मार्केटिंग व्यवस्थापक सूरज पाटील, CSR सहाय्यक वैभव दाभाडे आणि मार्केटिंग सहाय्यक अर्जुन देवकर उपस्थित होते.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण डी. ठाकूर यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशनमार्फत आरोग्य, सामाजिक विकास व जनजागृतीसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, या कार्याचे समाजातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या