प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील जुळेवाडी येथील श्री नृसिंह विकास सेवा सोसायटी मर्या.जुळेवाडी या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले असून,माजी खासदार संजयकाका पाटील गटाने सोसायटीवरील आपली सत्ता कायम राखली आहे.गावातील सर्व घटकांनी एकोप्याची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्याने सहकार क्षेत्रात जुळेवाडीचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.या निवडणुकीत एकूण १२ संचालक बिनविरोध निवडून आले.निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून,सभासदांनी एकीचे दर्शन घडविल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी,संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.नव्याने निवडून आलेल्या संचालकांनी शेतकरी,सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिकाधिक विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.बिनविरोध निवडीबद्दल माजी खासदार संजय (काका) पाटील आणि युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव,आर.डी.आप्पा पाटील, विजय खोत,माजी सरपंच अनिल शंकरराव पाटील,संतोष पाटील, चंद्रकांत खोत,अतुल कोकाटे, नितीन मंडले,सचिन जाधव (मेजर), मनोज निकम,संदीप बाबुराव जाधव,अरुण फडतरे आणि विठ्ठल चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, सभासद,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिनविरोध निवडणुकीमुळे जुळेवाडी गावातील सहकार,एकी आणि विकासाच्या राजकारणाचा आदर्श पुन्हा एकदा समोर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या